स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

स्वराज्य योद्धा ट्रेकर्स

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

गडकोटांवरील पाणीव्यवस्था

🎪गडकोटांवरील पाणीव्यवस्था 🎪

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

देशभरामध्ये पाणीटंचाईमुळे भिषण दुष्काळ पडतो, लोकांना प्यायला पाणी भेटत नाही, कित्येक आया बहिणींना पाणी आणण्यासाठी जीवावर बेतून कित्येक मैल वणवण करावी लागते. प्राण्यांना चारा तर सोडा एकवेळ प्यायला पाणी मिळेना म्हणून लोकांनी जनावरे सोडून दिली, हे मुखे प्राणी पाण्याच्या व्याकुळतेने टाचा घासून मृत्यू पावले कारण ज्या ठिकाणी माणसालाच पाणी मिळेना त्या ठिकाणी या भाबड्याना कोठून पाणी मिळणार....
छ. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात असे बिकट दिवस यावे हि शोकांतिका व भविष्याची काळजी करणारी गोस्ट आहे. अरे महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून आपण शिकलो काय मग?? काय म्हणून आपण नुसता गर्व बाळगतो?? खरच आम्हाला छत्रपती समजले का?? खरच आम्ही त्यांचे विचार आत्मसात केले का??? महाराजांचा वैद्यानिक दृष्टिकोन पहिला का/ आत्मसात केला का??? या सर्वांच एकच उत्तर... "नाही".

एकीकडे राज्यात दुष्काळ स्थिती असताना 350 वर्षापुर्वीच्या गडकिल्यांवर पाणी मिळते याचा अर्थ आताच्या हजारपटिने चांगली त्याकाळची दूरदृष्टी होती म्हणूनच आज तुम्ही कोणत्याही गडांवर गेलात तर तुम्हाला पाण्याची भरलेली टाके, तळी, तलाव दिसतील.
आजकाल भरपूर लोक गडकोटांवर जातात पण ते पुरेश्या महितीअभावी म्हणा किंवा काहि लोक फक्त पीकनिक म्हणून येतात, तर काहीशे लोक फक्त ट्रेकिंग थरार असतो म्हणून गडकिल्याना भेट देतात, बर काही असो कोणत्या ना कोणत्या कारणानं का होहीना गडकोटांवर भटके वाढले किंवा गडकोट प्रेम वाढत चाललंय यातच एक प्रकारच समाधान मानुया.

गडकिल्ले/ स्वराज्य टिकवायचे म्हणजे गडांवर पाण्याचा मुबलक साठा झाला पाहिजे, कारण एकदा का युद्ध सुरु झाले कि ते 2-3 महिने चालत असे, अशावेळी गडावरून खाली येणे म्हणजे धोक्याचे किंवा शरणागती पत्करणे हा अखेरचा डाव असे त्यामुळेच छ. शिवराय आपल्या कारागिरांना संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करत असत, त्यांच्याकडून त्यापद्धतीने काम करून घेत असत म्हणूनच स्वराज्य निर्मितीच्या काळात जिगरबाज  मावळ्यांनी गडकोटांच्या मदतीने शत्रूला माघार घ्यावी लावली होती.

गडांवर पाणी साठवण्याची साधने म्हणजे कातळात कोरलेली पाण्याची टाके, पठारांवर तयार केलेली तळे/ तलाव, ठिकठिकाणी काळ्या कातळात खोदून निर्माण केलेले खळगे. पावसाळ्यात तयार होणारे झरे यांची अडवणूक करून बांधलेले छोटे बंधारे असे भरपूर नमुने आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर वेगवेगळ्या निर्मितीत आपल्याला पाहायला मिळतात.

पाणीसाठा करताना इतरही गोष्टी विचारात घेतलेल्या दिसतात जसेकी, उघड्या पठारावर निर्मित केलेल्या टाक्यांमधील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते व टाके लवकर मोकळे होते म्हणून टाक्याच्या चारी बाजूला गोल खोबण्या तयार केलेल्या आहेत, या खोबण्यामध्ये लाकूड घालून वरती पाचोळ्याचे किंवा कापडाचे आच्छादन तयार केले जात असे जेणेकरून बाष्पीभवन होत नसे. दुसरी गोस्ट म्हणजे पाण्याची टाके व दारुगोळा कोठार कधीच जवळ जवळ  बांधलेली नाहीयेत जेणेकरून पाण्याचा निचरा होऊन पाणी कोठारामध्ये जाऊ नये याची दक्षता घेतलेली दिसते. किल्ले कुलंग, किल्ले हडसर, किल्ले हरिश्चंद्रगड या गडांवर पाण्याची टाके ज्या घळीतून पाण्याचा प्रवाह होतो त्या घळीमध्येच टाके तयार केलेली आहेत जेणेकरून गडावरून खाली पडणारे पाणी प्रथम या टाक्यांमध्ये पडून, टाके भरल्यानंतरच ते खाली पडत असे त्यामुळे टाके भरायला वेगळी व्यवस्था करायची गरज महाराजांना भासली नसावी.

तसेच दुर्गबांधणी मधेही आपल्याला चांगले बांधकाम पाहायला मिळते, ज्या ठीकानि देवडया (पहारेकर्यांची जागा) तेथे काळा कातळ असल्यामुळे पावसाळ्यात पाणी ओळघळून आतमध्ये येते म्हणून देवड्यांच्या वरती खाचा तयार करून ते पाणी बाजूला पाडले जाते, किल्ले हडसर वर हे काम पाहायला मिळते, तसेच अंबरखान्यामधेही हेच काम दिसते. गडाभोवती तटबंदी असते, पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे तटबंदीला धोका पोहचू नये म्हणून तटबंदीमधून विशिष्ट खोबण्या तयार करून किंवा गायमुख सारखे चिरा तयार करून पाणी बाहेर पाडले जाते (किल्ले कुलंग व किल्ले चावंड वरती हे पाहायला भेटते).
जे किल्ले काळया कातळात घडवले आहेत अश्या किल्ल्यांवर पावसाळ्यात पायऱ्यांवर्ती शेवाळ वाढते व पायऱ्या पूर्णपणे घसरड्या होतात, यावरून कोण खाली पडू नये म्हणून पायऱ्यांवरती पकडण्यासाठी खोबण्या घडवलेल्या दिसतात, तसेच पायर्यांच्या बाजूने 70-80 cm ची चर खोदून पाणी पायऱ्यांवरती येणार नाही याची काळजी घेतलेली दिसते (किल्ले हरिहर, रतनगड वरती याचे उत्तम नमुने दिसतात).

याबरोबर पाणी साठवण्यासाठी टाक्यांबरोबर दगडामध्ये कोरून तयार केलेली भांडी आपणास भरपूर गडावर पाहायला मिळतात ( किल्ले रामसेज, किल्ले चावंड, किल्ले हडसर)

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
                संशोधन/ लेखन-

इतिहासप्रेमी. मनोज शिवाजीराव महाडिक
      स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान, सांगली
     9890354353/ 9156571313

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा